News

electricity bill : वीज दरा मध्ये मोठे बदल महावितरणचा मोठा निर्णय

electricity bill : वीज दरा मध्ये मोठे बदल महावितरणचा मोठा निर्णय

electricity bill

आधीच mahavitaran महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी आणखी धक्कादायक बातमी आहे. MSEDCL (FAC) महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना विजेसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम राज्यातील ग्राहकांवर होणार आहे.   electricity bill

कोळसा आणि इंधनाच्या किमती वाढल्यानंतर, महावितरण इंधन समायोजन आकार वाढवते. त्याला MERC ची मान्यता आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत इंधन समायोजन आकारात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, पुढील पाच महिन्यांसाठी दर वाढविण्यात आले. मार्च 2022 ते मे 2022 पर्यंतच्या इंधन समायोजन आकाराच्या तुलनेत, सध्याचा FAC लक्षणीय वाढला आहे. महावितरणने जानेवारी 2022 मध्ये 25 पैसे प्रति युनिट दरातही वाढ केली होती. त्यावेळीही, महावितरणने समायोजन आकार का करण्यात आला हे स्पष्ट केले होते.    electricity bill

 इंधनाच्या किमती mahavitaran अचानक वाढल्याने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय, वीजदरात भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्यांच्या आधीच पिळलेल्या खिशाला आणखी धक्का बसेल. याशिवाय, अलीकडेच गॅसचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button