पोलीस कारवाई पालखी सोहळ्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला, 60 जणांना हातकड्या; पोलीस वारकरी वेशात फिरत होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. देहू आणि आळंदीतून प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. करोनानंतरचा पहिलाच पालखी सोहळा असल्याने यावर्षी वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक चोरट्यांनी वारकरी भाविकांचे मंगळसूत्र, पाकिटांवर डल्ला मारला आहे. palkhi sohala
.jpg)
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अशाच काही गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी वेषांतर केले होते. यामुळं ६० जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. palkhi sohala
देहू, आळंदी परिसरात पालखी सोहळ्यासाठी आलेल्या २२५ संशयित व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पैकी, ६० जणांना गुन्हा करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं असून अटक करण्यात आली आहे. दोन वर्षानंतर पालखी सोहळा वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला.
त्यामुळं मोठ्या प्राणावर गर्दी झाली होती. याचा फायदा चोरटे उचलत होते. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे.