News

( modi ) ललित मोदी आणि सुष्मिता सेन नात्यात, लवकरच लग्न करणार असल्याची माहिती

  (  modi  ) ललित मोदी आणि सुष्मिता सेन नात्यात, लवकरच लग्न करणार असल्याची माहिती

modi

ललित मोदींनी सुष्मिता सेनसबोतचे चार फोटो ट्वीट केले आहेत. मालदीव आणि सार्डिनियामधून लंडनमध्ये परतल्यानंतर सुष्मिता सेनसोबतचे फोटो ललित मोदींनी ट्वीट केले.

ललित मोदी कोणत्या वादात अडकले होते?

सर्वांत पहिल्यांदा ललित मोदी राष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकले जेव्हा ते 2005 मध्ये अचानकपणे राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यावेळी भाजपची राजस्थानमध्ये सत्ता आली आणि त्यानंतर लगेचच ते क्रिकेट संघाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर ते बीसीसीआयचे उपाध्यक्ष बनले.

यंदाचं आयपीएल फिकं का ठरलं?

2008 मध्ये त्यांनी आयपीएलची सुरुवात केली होती. ते आयपीएलचे पहिले कमिश्नर बनले. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट लीग असा आयपीएलचा नावलौकिक बनला.

2010 मध्ये नव्याने तयार करण्यात आलेली कोची टस्कर्स या टीमच्या मालकांचे प्रारूप ट्वीट द्वारे उघड केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कोची टस्कर्सच्या मालकांची नाराजी त्यांनी यामुळे ओढावून घेतली होती. या टीम मालकांपैकी एक नाव सुनंदा पुष्कर यांचे देखील होते. सुनंदा या तत्काली परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. यानंतर शशी थरूर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button