gumasta license online शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |
gumasta license online शॉप ॲक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे |

gumasta license online नमस्कार मित्रांनो, आज आपण शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजेच (गुमास्ता) दुकानाचा परवाना ऑनलाइन कसा काढायचा या बद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो उद्योग, व्यवसाय, हॉटेल या कामांसाठी किंवा दुकानांसाठी शॉप ॲक्ट लायसन्स हे खूप आवश्यक असते. ते प्रत्येक दुकानदारा कडे असायला हवे. तुम्ही छोट्या गावात राहत असाल किंवा शहरात राहत असाल, तुमच्या कडे शॉप ॲक्ट लायसन्स हे असायलाच हवे. नाही तर तुमचा व्यवसाय किंवा उद्योगाला कायदेशीर मान्यता प्राप्त नसल्याने भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल.
पण शॉप ॲक्ट लायसन्स काढायचे कसे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते. तर आज आपण त्या बद्दल सविस्तर जाणून घेऊया gumasta license online
सर्वात आधी आपण बघू की शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे नेमकं काय असतं…
मित्रांनो, शॉप ॲक्ट लायसन्स म्हणजे हे लायसन्स तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी कायदेशीर परवानगी देते. हे राज्य सरकारच्या दुकान व आस्थापना कायदा च्या अंतर्गत सर्व व्यावसायिक दुकान दारांनी कायद्याने ठरवून दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या दुकान दाराने व्यवसाय चालवण्यासाठी कायद्या अंतर्गत नवीन व्यवसायाची नोंदणी करणे व त्याचा परवाना घेणे खूप आवश्यक आहे. शिवाय व्यवसाय/दुकान चालू केल्यावर, नोंदणी अर्ज 30 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.