MotivationalNews

(Berojagari) छुपी बेरोजगारी

 छुपी बेरोजगारी

आज mpsc चं नोटिफिकेशन दुपारी 2 च्या सुमारास आलं त्यावेळी मी सुप्रीम कोर्टातल्या एका खटल्यावरचं विवादित संभाषण वाचत बसलो होतो. आर्टिकल एकदम भारी होतं. CJI सरांनी दिलेल्या एका अनएक्सपेक्टेड निकालाबद्दल होतं ते. तेवढ्यात चेत्याने मला बाहेर बोलवून घेतलं आणि ही mpsc ची न्यूज सांगितली. Berojagari

मला तेवढं काही वाटलं नाही पण रिडींग मधले तयारी करत असणारे सगळेजण एकेक बाहेर येऊन चर्चा करू लागले, काहीजण फोन वर बोलू लागले. सोबतच्या एका मित्राने बाजूला जाऊन सिगरेट पेटवली, रेस्ट रूम मध्ये झोपलेल्या मित्राला कोणीतरी उठवून सांगून झालं होतं तोपर्यंत. (Berojagari)

Berojagari

(Berojagari)

खरतर आमचंही हे नेहमीच डिस्कशन असतं की कधी सो कॉल्ड सेटल होणार? 27 झाली आयुष्याची. सोबतच्या पोरांची लग्न होऊन पोरं व्हायला आली आणि आपलं आणखी कशात काही नाही वगैरे वगैरे. खरतरं हे एका दृष्टीने बरोबरच आहे, इथं माणूस शिकला जातोय मुळात त्याला जॉब, पैसा अन चांगला साथीदार मिळवण्यासाठी. बाकी काही देणंघेणं नाही कोणाला, देणंघेणं इन द सेन्स स्वतःच्या आवडी-निवडी, छंद आणि स्वप्नांचं. सगळे जण रेस मध्ये लागली आहेत. असो आपला हा मुद्दा नाहीये सध्याचा. तर मी सांगत होतो रिडींग मध्ये निराशा पसरली होती, प्रत्येकजण मोठ्या साहेबांना(CM) अन छोट्या साहेबांना(Dycm) शिव्या घालत होते, त्यातल्या त्यात EWS अन मराठा आरक्षणाचा विषय निघू लागला.

समजत नव्हतं नेमकं आपल्या या तरुण पिढीबद्दल असा का होतंय अन केलं जातंय? जागा असतात सातशेक अन फॉर्म भरले जातायेत सातेक लाखांवर. त्यातही वर्षातून एकदाच परीक्षा होणार, त्यात तिचे एकूण तीन टप्पे आणि समजा सगळं व्यवस्थित झालं तर जॉइनिंग व्हायला किमान लागणारे दोन वर्षे. आणि समजा नाही झालं तर त्यांचा मुकाबला आधीच्या फेलुअरसोबत आणि विविध क्षेत्रातील पदवी घेऊन लंगोटी घालून उतरलेल्या आणखी दीडेक लाख पोरांसोबत. मी घरच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केलेला नाही आणखी अन मला तो मांडायचा सुद्धा नाहीये. कारण इट्स माय चॉईस म्हणणारे भरपूर जणे/णी आहेत आपल्यात. 

2019 पासून पेपर झालेला नाहीये, मुलं रिडींग,मेस अन समाजाशी तोंड देताहेत एकाच आशेवर की त्या सातशे जागांपैकी आपल्याला एक जागा मिळवायची आहे तीही सातशेक लाख विद्यार्थ्यांमधून. (Berojagari)

म्हणजे आपल्या या तरुण देशात या तरुण रक्ताची झालेली परिस्थिती एकदम घराब होत आहे, मी यात समाजाच्या मेंटालिटीबद्दल बोलणार नाहीये पण मी या छुप्या बेरोजगारीवर नक्की बोलू शकतो. राजकारणी आणि आयोग यांना शिव्या घालून डोकं शांत करणार तर बिलकुल नाही तसेच देशाचा अन समाजाचा विचार तर बिलकुल करणार नाही हे नक्की. कारण ज्याच्या हातात काहीतरी बदलण्याची ओथोरिटी आहे तेच नेमके भ्रष्ट होत चालले आहेत, तेच लोकांच्या भावनेशी अन तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button