7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला काढले बाहेर, पतीच्या आत्महत्येनंतर ‘कॅफे कॉफी डे’च्या CEO मालविका हेगडे यांची Success story.
बीवी हो तो ऐसी
भारतातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट “कॅफे कॉफी डे” चे मालक व्हीजी सिद्धार्थ यांनी 2019 मध्ये 7,000 कोटी रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली, नंतर त्यांची पत्नी मालविकाजी यांनी कॅफे कॉफी डेचा व्यवसाय स्वतः चालवला, ज्यामुळे व्यवसाय फायदेशीर झाला आणि रु. 5,300 कोटी. कर्ज फेडले, आता माझ्यावर 1700 कोटींचे कर्ज आहे, हे या निमित्ताने एका महिलेने दिलेले उत्तम उदाहरण आहे. Success story

मित्रांसोबत वीकेंडला मजा मस्ती करायची असेल, पहिल्यांदा डेटवर जात असाल किंवा तुमच्या कुटुंबाला तुमच्या पहिला पगारातून ट्रीट द्यायची असेल, कित्येक ग्राहकांचा आवडता पर्याय म्हणजे कॅफे कॉफी डे(CCD). CCD हे प्रत्येक ग्राहकांसाठी हक्काचं ठिकाण होते, जिथे घालवलेला काही वेळ आयुष्यभराच्या आठवणींमध्ये म्हणून ते सोबत घेऊन जातात. पण जेव्हा जुलै 2019 मध्ये भारतातील सर्वात मोठी कॉफी शॉप चेन कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही. जी.सिद्धार्थ यांनी आत्महत्येची बातमी समोर आले तेव्हा देशातील सर्वांनाच धक्का बसला. मंगळूरजवळील नेत्रावती नदीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ३६ तासांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह नदीपात्रात सापडला. Success story